सारनाथला युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा (जुलै २०२६)

  • विषय भगवान बुद्धांची प्रथम उपदेश भूमी असलेल्या सारनाथ (उत्तर प्रदेश) या ऐतिहासिक स्थळाचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage Sites) यादीत समावेश.
  • स्थान व क्रमांक (भारतातील) ४५ वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ
  • स्थान व क्रमांक (उत्तर प्रदेशातील) ४ थे युनेस्को जागतिक वारसा स्थळ
  • घोषणा ठिकाण दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित युनेस्कोच्या ४८ व्या जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली.
  • संभाव्य यादी (Tentative List) सारनाथचा ३ जुलै १९९८ रोजी युनेस्कोच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला होता (तब्बल २८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अंतिम मान्यता).

उत्तर प्रदेशातील इतर युनेस्को वारसा स्थळे

  • ताजमहाल
  • आग्रा किल्ला
  • फतेहपूर सिक्री
  • सारनाथ (नवीनतम समावेश - पूर्वांचल भागातील पहिले स्थळ)

सारनाथ परिसरातील मुख्य स्मारके

युनेस्कोने मान्यता दिलेल्या या परिसरात खालील महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचा समावेश होतो:

  • चौखंडी स्तूप: भगवान बुद्धांची त्यांच्या पहिल्या पाच शिष्यांशी (पपंचवर्गीय) भेट झालेली जागा.
  • धमेख स्तूप (Dhamekh Stupa)
  • धर्मराजिका स्तूप (Dharmarajika Stupa)
  • सम्राट अशोकाचा स्तंभ (Ashoka Pillar)
  • प्राचीन बौद्ध विहारांचे अवशेष

ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व

  • धम्मचक्र प्रवर्तन (Dhammachakkappavattana): ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी सारनाथ येथेच आपला पहिला उपदेश देऊन 'धम्मचक्र प्रवर्तन' केले होते.
  • बौद्ध संघाची स्थापना: याच ठिकाणावरून बौद्ध संघाची औपचारिक स्थापना झाली.
  • कालावधी: गेल्या सुमारे २५०० वर्षांपासून सारनाथ हे बौद्ध अनुयायी, पर्यटन आणि अध्यात्माचे प्रमुख केंद्र राहिले आहे.